ठाणे

उल्हासनगरात धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर; मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार

मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींच्या मते, त्यांची मुलगी दृष्टीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती. परंतु, दृष्टी आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत कोणतीच माहिती दिली नसल्याने दृष्टीच्या कुटुंबीयांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

कल्पना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी दृष्टीची बुद्धी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लिम बनवले जात आहे तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय वाटत होता. तसेच दृष्टीकडून 'काफिर', 'जिहाद' असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाजविघातक, राष्ट्रविघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून फिर्यादींनी तक्रार करण्याचे ठरवले होते.

त्यानुसार कल्पना चौधरी यांनी गुरुवारी रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सृष्टी चौधरी, सलीम चौधरी, शबाना शेख, शबाना शेख हिची मुलगी महेक शेख, शबाना शेखची बहिण अमिना, अफिदा खातुन, अफिदा खातुनचा पती वसिम, बाबु दास, काझी इलियाज निजामी, ॲड. कमरुद्दीन अन्सारी या १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आरोपी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

माझ्या आईचा अपमान बिहारची जनता विसरणार नाही; पंतप्रधान मोदींची राजद, काँग्रेसवर टीका

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

उमर खालीद, शरजील इमाम यांना जामीन नाकारला; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमोडल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी