ठाणे

टिटवाळ्यात ६३ वीजचोरांविरुद्ध गुन्हा

या आरोपींनी १५ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

Swapnil S

डोंबिवली : महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा आणि खडवली परिसरातील ६३ जणांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी १५ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

मांडा शाखा कार्यालयांतर्गत दळवी चाळ, श्रद्धा चाळ, अन्सारी चाळ, मोहोली रोड, उंबारणी गाव, साईबाबा कॉलनी, सिद्धी विनायक कॉलनी, संतोषी माता नगर, एकदंत कॉलनी, गरीब नवाज चाळ, पिंपळेश्वर नगर, मानवी, स्वामी समर्थ चाळ, जीएम चाळ, मरयाम चाळ, अदनान चाळ तर खडवली शाखेतील निखिल चाळ, अशोक नगर, बाबा चाळ, नडगाव, गोटिया चाळ, सुशील चाळ, गजानन फॉर्च्युन सिटी, निंबवली आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी ६३ जणांकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. परंतु विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने मांड्याचे सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्या फिर्यादीवरून ४० आणि खडवलीचे कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून २३ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन