मुंबईत अल्पवयिन मुलीवर बलात्कार प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते
ठाणे

वाढदिवसाची पार्टी करू असे सांगत वाईन पाजून बलात्कार, गुन्हा दाखल

गुन्ह्याचा तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर हे करत आहेत.

Swapnil S

भाईंंदर : मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सेव्हन इलेव्हन पंच तारांकित क्लबमध्ये एका इसमाने ३१ वर्षीय पीडितेला तिच्या वाढदिवसाची पार्टी करू असे, सांगून तिला इच्छेविरोधात वाईन पाजून पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय पीडितेला तिच्या वाढदिवसाची पार्टी सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये करू असे सांगून २६ सप्टेंबर रोजी पीडितेला वाईन पाजून तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला. तसेच त्याचवेळेस राजीव वल्लभ मायडा (४०) याने सहा लाख घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर हे करत आहेत.

Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचले; BMC निकाल बघून म्हणाले, "मी मुंबईत येऊन उद्धव-राज...

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप