थायलंडमध्येही ‘देवाभाऊं’चा डंका 
ठाणे

थायलंडमध्येही ‘देवाभाऊं’चा डंका

लंडन, तुर्कीये, इथिओपिया, ब्राझील, केनिया, स्वित्झर्लंड, रवांडा, श्रीलंका आणि इजिप्तनंतर आता थायलंडमध्येही ‘देवाभाऊ’ चष्मा उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.

Swapnil S

बदलापूर : लंडन, तुर्कीये, इथिओपिया, ब्राझील, केनिया, स्वित्झर्लंड, रवांडा, श्रीलंका आणि इजिप्तनंतर आता थायलंडमध्येही ‘देवाभाऊ’ चष्मा उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.

बदलापूर येथील व्हिजन फ्रेंड साकिब गोरे यांच्या ‘देवाभाऊ व्हिजन’ उपक्रमाला २९ देशांच्या ‘एशिया पॅसिफिक कमिटमेंट’ या जागतिक नेत्र आरोग्य परिषदेत मान्यता मिळाली. या परिषदेत साकिब गोरे यांनी अंधत्व निवारणासाठी मांडलेल्या ‘देवाभाऊ मॉडेल’च्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले.

‘ग्लोबल आय हेल्थ समिट’साठी देशनिहाय आराखडे तयार करण्याच्या उद्देशाने अलीकडेच थायलंडमधील बँकॉक येथे जागतिक नेत्र आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत थायलंड सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, यांच्यासह २९ देशांतील मंत्री, नेते, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्रातील भागीदार अशा ८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

जागतिक स्तरावर आरोग्य सेवा उपलब्ध असल्या तरी त्या सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत, ही समस्या अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत ‘देवाभाऊ मॉडेल’ने या समस्येवर एक व्यवहार्य आणि प्रभावी उपाय सुचवला, हे या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले.

‘देवाभाऊ व्हिजन’ उपक्रमामध्ये नवीन रुग्णालये किंवा सुविधा उभारण्याऐवजी विद्यमान शासकीय नेत्रसेवा यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे वापरण्यावर भर दिला जातो. स्थानिक नेतृत्व, केंद्रीकृत समन्वय प्रणाली, स्वयंसेवी संस्था, खासगी भागीदार आणि समुदाय पातळीवरील तपासण्या यांच्या माध्यमातून नागरिकांना वेळेवर तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जातात.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन