@oakprasad/ Instagram
ठाणे

धर्मवीर-२ मध्ये दिघेंच्या हिंदुत्वाचा अवमान

Swapnil S

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ या चित्रपटावरून देखील आता ठाण्यात आरोपांची राळ उठायला सुरुवात झाली आहे. स्वत:ला मोठे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंना लहान का दाखवित आहेत? आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुख्यमंत्री आणि धर्मवीर-२ च्या टीमकडून अवमान झाला असल्याची पोस्ट शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी एक्स या सोशल मीडियावर टाकली आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमान होत आहे. स्वत:ला मोठे दाखविण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवित आहेत? असा सवाल त्यांनी फेसबुक आणि एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. दरम्यान, या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून या चित्रपटामुळे चांगलाच वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केदार दिघे संतप्त

चित्रपटातील संवादामध्ये तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार..असा डायलॉग दिघेंच्या तोंडी धर्मवीर-२ चित्रपटात टाकण्यात आला आहे. मुळात दिघेंचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार दिघे करत होते, मग आनंद दिघे कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील? आणि ते शिंदेंना का सांगतील? असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था