ठाणे

भात खरेदी घोटाळ्यातील संचालक अखेर अटकेत

शहापूर तालुक्यातील साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या संचालकांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे आर्थिक शाखेबरोबरच किन्हवली पोलिसांना यश आले आहे.

Swapnil S

शहापूर : शहापूर तालुक्यातील साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या संचालकांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे आर्थिक शाखेबरोबरच किन्हवली पोलिसांना यश आले आहे. सन २०२२-२०२३ वर्षाकरिता शेतकऱ्यांच्या हजारो क्विंटल भात खरेदीची जबाबदारी असलेल्या तालुक्यातील साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे संचालक जयराम सोगीर (रा. जांभूळवाड) यांनी शेकडो क्विंटलचा भात खरेदी घोटाळा करून रक्कम रुपये १ कोटी ६० लाखांची शासनाची फसवणूक केली आहे.

याबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी फिर्यादी म्हणून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी केवळ सहीचा मालक म्हणून संजय पांढरे तसेच आणखी एका जणांवर देखील आरोप ठेवण्यात आले होते. त्यामध्ये संजय पांढरे गेली वर्षभर जेलचे हवा खात असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयराम सोगीर याला परवा रात्री आठ वाजेच्या सुमारास जांभूळवाड येथील राहत्या घरून ताब्यात घेण्यात गुन्हे आर्थिक शाखेच्या मदतीने किन्हवली पोलिसांना यश आले आहे.

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीत अधिक चौकशी केली असता आणखीन मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चौकशीची मागणी करत आहेत.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

बिहार काँग्रेसच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ; राहुल यांनी माफी मागण्याची भाजपची मागणी

'ऑनलाईन गेमिंग' कायद्याला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान