प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Dombivali : अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

डोंबिवली पूर्व स्टेशन बाहेरील फडके रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेचे 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाई केली.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली पूर्व स्टेशन बाहेरील फडके रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेचे 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाई केली.'कचरा तुम्ही केला आहे साफ पण तुम्हीच करा' असे म्हणत सहाय्यक आयुक्त फेरीवाल्यांवर संतापल्या. फेरीवाल्यांनी ज्या ठिकाणी बस्तान बसवले होते, तेथील जागा स्वच्छ करून सहाय्यक आयुक्तांनी एक नियम घालून दिल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

पालिका प्रशासनाकडून सातत्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नेहमीप्रमाणे सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी पथकासह फडके रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. फुटपाथवर दुकानदार पुतळे ठेवत असल्याने नागरिकांना नाईजास्तव रस्त्यावरून चालण्याची वेळ येते. सदर कारवाईत सहाय्यक आयुक्तांनी दुकानदारांना समज देऊन पुन्हा पुतळे फुटपाथवर दिसल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.

तुमचा कचरा तुम्हीच साफ करायचा

फुटपाथवरही फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा रस्ता आपलाच आहे, अशा आवेशाने फेरीवाले बसले असल्याचे पाहून सहाय्यक आयुक्तांनी फेरीवाल्यांना सुनावले. बाजीप्रभू चौकात अनेक फूल विक्रेत्यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा केल्याने हेमा मुंबरकर यांनी तुमचा कचरा तुम्हीच साफ करायचा असा एकप्रकारे नियमच घालून देऊन तो रस्ता स्वच्छ करून घेतला.

दुचाकीची अनधिकृत पार्किंग

रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत दुचाकी पार्किंग डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौक व फडके रोडवरील दोन्ही बाजूस दुचाकी अनधिकृत पार्किंग केली जाते. या परिस्थितीकडे वाहतूक पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने हम करो सो कायदा असे दुकानमालक कुठेही पार्किंग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वास्तविक पार्किंग समस्या मोठी आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या