Dombivli : मराठी तरुणीच्या मदतीला धावली मनसे; अविनाश जाधव यांचे मदतीचे आश्वासन 
ठाणे

Dombivli : मराठी तरुणीच्या मदतीला धावली मनसे; अविनाश जाधव यांचे मदतीचे आश्वासन

डोंबिवलीतील स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या एका मराठी तरुणीवर केडीएमसीकडून झालेल्या कारवाईमुळे ती भावूक झाली. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, “मराठी मुलीच्या पाठीशी कोणी उभं राहील का?” असा सवाल केला. हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्या पाहण्यात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांना तत्काळ तिच्या मदतीचे आदेश दिले.

Swapnil S

डोंबिवली : स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करण्याचा निर्धार केलेल्या डोंबिवलीतील एका तरुणीवर झालेल्या मराठी केडीएमसीकडून कारवाईमुळे तिच्या डोळ्यांत अश्रू आले. आपली व्यथा तिने सामाजिक माध्यमांवर व्हिडीओच्या माध्यमातून मांडत, "मराठी मुलीच्या पाठीशी कोणी उभे राहील का?" असा भावनिक सवाल केला होता. हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाहण्यात आला आणि त्यांनी तत्काळ मनसैनिकांना तिच्या मदतीला धाव घेण्याचे निर्देश दिले.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत येऊन संबंधित तरुणीची प्रत्यक्ष भेट घेतली व तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मनसेकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल तरुणीने मनसेचे आभार मानले. डोंबिवली परिसरात ही मराठी तरुणी गाडीवरून शोरमा विक्रीचा व्यवसाय करत असून, पालिकेकडून केवळ तिच्याच गाडीवर वारंवार कारवाई केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे. दुसरीकडे, स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांकडे स्थानिक पोलीस व केडीएमसीकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

मराठी तरुणीच्या आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. मराठी माणसावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. महापालिकेच्या दुटप्पी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.
अविनाश जाधव, मनसे नेते

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट