(Photo - insta/Dombivilivibes) 
ठाणे

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर

डोंबिवली येथील कल्याण-शीळफाटा रस्त्यालगतच्या देसाई खाडीत सुटकेसमध्ये एका तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या साथीदारानेच तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि उड्डाणपूलावरून खाडीत फेकून दिला.

नेहा जाधव - तांबे

डोंबिवली येथील कल्याण-शीळफाटा रस्त्यालगतच्या देसाई खाडीत सुटकेसमध्ये एका तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या साथीदारानेच तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि उड्डाणपूलावरून खाडीत फेकून दिला. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. डायघर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश करत तपासात धक्कादायक माहिती उघड केली आहे.

सोमवारी (दि. २४) दुपारी १.४५ च्या सुमारास पलावा उड्डाणपुलाखालील देसाई खाडीजवळ बेवारस सुटकेस दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. सुटकेस उघडताच आत कुजलेल्या अवस्थेतील एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून खून किमान तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला.

क्राइम ब्रँच, फॉरेन्सिक पथक आणि डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आला. खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

२४ तासांत आरोपी गजाआड

सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावरील माहिती आणि परिसरातील तपासाच्या आधारे पोलिसांनी फक्त २४ तासांत आरोपीचा शोध घेतला. विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (३२) याला अटक करण्यात आली. तपासात उघडकीस आलेली पार्श्वभूमी अधिकच हादरवणारी ठरली.

भीक मागणाऱ्या तरुणीला घरी आणलं आणि…

मृत तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा असून ती मूळची उत्तर प्रदेशातील आहे. तब्बल पाच वर्षांपूर्वी मुंब्रा स्टेशनवर ती भीक मागताना आरोपी विनोदला दिसली. त्याने तिला दया दाखवत घरी आणलं आणि तेव्हापासून दोघे एकत्र राहत होते. परंतु, हे नातं पुढे विकृत व हिंसक वळण घेत गेलं.

किरकोळ वादातून खून

२१ नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात विनोदने प्रियंकाचा गळा दाबून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून घरातच लपवून ठेवला.

दुर्गंधी वाढली आणि… देसाई खाडीत बॅग फेकली

खून केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी बॅगेतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने आरोपी गोंधळला. २२ नोव्हेंबरला तो मृतदेह भरलेली सुटकेस घेऊन देसाई खाडीवरील पुलावर पोहोचला आणि ती खाली फेकून दिली. सुटकेस खाली पडताच तुटली आणि मृतदेहाचे काही भाग बाहेर पडले.

२४ नोव्हेंबरला एका नागरिकाने हे भीषण दृश्य पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर तपास वेगाने पुढे सरकत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

थरारक CCTV Video समोर

या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दिसतंय, सुटकेस घेऊन आरोपी पुलावर जातो, वजनामुळे तो सुटकेस ओढत नेतो आणि ती खाली फेकतो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. डायघर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

"माझा मुलगा असा वागला असता तर..."; पंकजा मुंडेंनी घेतली गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट