डोंबिवली : तरुणाच्या हत्येप्रकरणी एकूण पाच जणांना अटक 
ठाणे

डोंबिवली : तरुणाच्या हत्येप्रकरणी एकूण पाच जणांना अटक

जुन्या वादातून साहिल गायकवाड या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील तेलकोसवाडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Swapnil S

डोंबिवली : जुन्या वादातून साहिल गायकवाड या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील तेलकोसवाडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून काही तरुणांनी साहिलवर हल्ला केला. यावेळी त्याच्या छातीत चाकूने वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हर्षद गिरी (२०), दिशांत गायकवाड आणि कमलेश मोकल या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत सहभागी असल्याच्या संशयावरून अन्य दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही