ठाणे

उल्हासनगर : हॅन्ड ब्रेक लावून ड्रायव्हर खाली उतरला, आपोआप सुरू झाली बस अन्...

Swapnil S

उल्हासनगर : हॅन्ड ब्रेक लावून चालक हा खाली उतरल्याने आपोआप सुरू झालेल्या बसने चालकाविना प्रवास करून विद्युत पोलला धडक देऊन आणि तीन गाड्यांचे नुकसान केल्यानंतर ही बस एका घरावर आदळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.

तलरेजा ट्रॅव्हल्स ही बस तक्षशिला शाळेतील सहलीसाठी आणण्यात आली होती. ही बस सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले रोडवर उतारावर उभी करून आणि हॅन्ड ब्रेक लावून चालक खाली उतरला. मात्र आपोआप सुरू झालेल्या या बसने काही अंतरापर्यंत चालकाविना प्रवास करून तीन गाड्यांचे नुकसान करून विद्युत पोलला धडक देऊन एका घरावर आदळली. सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या अनपेक्षित अपघातप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून गाड्यांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण

Maharashtra HSC 12th Result 2024: यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल तर 'या' विभागाचा सर्वात कमी निकाल!

KTM ची Duke 200 आणि 250 आता नव्या रंगांमध्ये उपलब्ध...जाणून घ्या कोणते असतील नवे रंग

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू