File photo
File photo 
ठाणे

१८ जणांकडून वीजचोरी

Swapnil S

उरण : महावितरण कंपनीकडून करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यातील १८ वीजचोरांकडून ५० हजार वीज युनिटची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी महावितरणच्या उपविभागाने १० लाख ३३ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. अनेक ठिकाणी वीजचोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नियमित वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे उरणच्या महावितरणच्या उपविभागात वीजचोरी विरोधात धडक कारवाईत उरण शहर, जासई, करंजा, विंधने, जसखार या गावात डिसेंबर महिन्यात १८ वीजचोरांकडून अंदाजे ५० हजार युनिटची वीजचोरी पकडून सुमारे १०.३३ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला असल्याची माहिती उरणच्या महावितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता विजय सोनावले यांनी दिली आहे.

घाटकोपरमधील होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती समोर, फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश

Video : घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग BPCLपेट्रोल पंपावर कोसळलं; ४ जणांचा मृत्यू , 50 हून अधिक जखमी

Video : मतदान केंद्रावरच भिडले आमदार आणि मतदार, तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! चक्क काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावे बोगस मतदान; मतदान न करताच फिरावं लागलं माघारी

एक नंबर! ट्रेनचं तिकीट कॅन्सल केल्यावर फक्त ६ तासांत मिळणार रिफंड