@RavinderKapur2/X
ठाणे

भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल तीस वर्षे कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून कायम सत्तेच्या परिघात राहणारे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल तीस वर्षे कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून कायम सत्तेच्या परिघात राहणारे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. यावेळी विलास पाटील यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र मयुरेश पाटील व अनेक समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विलास आर. पाटील भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने भिवंडी पश्चिममधील भाजप आमदार महेश चौघुले यांना तगडे आव्हान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

भिवंडी नगरपालिका असताना नगराध्यक्ष तर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर वीस वर्षांच्या काळात सर्व पक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात विलास पाटील यशस्वी झाले आहेत. स्वतः एक वेळ तर पत्नी प्रतिभा पाटील यांनी दोन वेळा व त्यांच्या गटाच्या यशश्री कडू यांनी एक वेळ अशी सत्ता उपभोगली आहे. वडील स्व. आर. आर. पाटील हे काँग्रेस पक्षात कार्यरत होते. त्यांचे संस्कार आपणावर असून आम्ही केलेल्या कार्याच्या जीवावर मतदारांसमोर जाणार असून सर्व समाजातून मोठा पाठिंबा आम्हाला मिळत असल्याचा विश्वास विलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते