ठाणे

मुरुड नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु

प्रतिनिधी

मुरुड नगरपरिषदेची स्थापना १८८८ सालची असून कोकणातील एकमेव जुनी नगरपरिषद म्हणून पहिले जाते. मुरुड शहराची लोकसंख्या १२ हजार ६८२ असून या निवडणुकीकरता १० हजार ८८२ मतदाते मतदान करणार आहेत. मुरुड नगरपरिषदेची वॉर्ड रचना सुद्धा तयार झाली असून त्यावरची सर्व प्रक्रिया सुद्धा संपन्न झाली आहे.

मुरुड नगरपरिषदेची निवडणूक हि नेहमीच चुरशीची होत असते. यंदाची हि निवडणूक सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळत असून त्यामुळे थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी भेटी गाठी सुद्धा सुरु केल्या आहेत. यंदाची प्रभाग रचना पार बदलून टाकण्यात आली आहे.त्यामुळे जुने नगरसेवक ज्या प्रभागातून निवडून आले आहेत तो भाग पूर्णतः बदल्याने प्रत्येक नगरसेवकाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.हक्काचा असा मतदार संघ आता नगरसेवकांचा राहिलेला नाही.जुन्या नगरसेवकांना सुद्धा नवीन भाग मतदार संघाशी जोडल्यामुळे प्रत्येकाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी स्वतः जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुरुड नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचे प्राबल्य आणण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

ATMमधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्यास काय करायचं? काय सांगतो RBIचा नियम