ठाणे

डोंबिवलीत गणेश मंदिर प्रभाग दुसऱ्याच भागात,भाजपच्या माजी नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

आगामी पालिका निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झाली असून निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ करण्यात आला असल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केली आहे. डोंबिवली गणेश मंदिर जयहिंद कॉलनी प्रभागातील सुमारे दिड ते पावणे दोन हजार मतदारांची नावे मोठा गावं ठाकुर्ली आनंदनगर नवागाव प्रभागात वर्ग केली आहेत. मुळात गणेश मंदिर प्रभागात राहणारे माजी नगरसेवक व त्याच्या कुटुंबियांची नावेही त्याच्या गणेशमंदिर प्रभागात नसूनतीही दुसऱ्याच प्रभागात जोडली आहेत. प्रभागाचे नाव गणेश मंदिर मात्र मंदिराचा दुसऱ्या प्रभागात ही पद्धत कोणती? असा सवालही धात्रक यांनी केला आहे. याबाबतीत जर निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करणार असा इशारा धात्रक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झाली असून निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्यामुळे प्रारूप प्रभाग मतदार याद्या पालिकेच्या निवडणूक विभागाने घोषित केल्या आहेत. प्रथमच त्रिसदस्यीय पध्दतीने निवडणूक होणार आहे. तीन वार्डचा एक प्रभाग निर्माण करून तीन प्रभागातील मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 32 प्रभागातुन एकूण ३० ते ३५ हजार मतदार असलेला प्रभाग करण्यात आला होता. त्याप्रमाणे रचनेनुसार प्रभागातील प्रारूप मतदार यादी जहागीर करण्यात आली. भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी याच प्रारूप मतदार यादीबाबत आक्षेप घेतला आहे.

भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित; शहरातील २१ टक्के मतदान केंद्र संवेदनशील, पोलिसांनी विशेष खबरदारी वाढवली

Thane Election : ठाण्यात १७६ मतदान केंद्र संवेदनशील; निवडणूक शांततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध उमेदवारांची घोषणा; राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची माहिती

Thane Election : ठाण्यात रंगले 'बॅनर' युद्ध; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; विकास विरुद्ध असंतोष

आयआयटी मुंबईत 'परमरुद्र' सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित; सी-डॅकच्या माध्यमातून उभारणी; प्रगत संगणकीय संशोधनासाठी होणार मदत