ठाणे

गँगस्टर सुरेश पुजारीचा हस्तक मिर्चू शर्माला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निर्णय

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीचा हस्तक मिर्चू शर्मा याला २०१० साली झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कल्याण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीचा हस्तक मिर्चू शर्मा याला २०१० साली झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कल्याण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पीडित व्यक्तीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याच्या वैद्यकीय उपचारांच्या अहवालावर आणि साक्षीदारांच्या साक्षीवर आधारित न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सोबतच, मिर्चू शर्मा याला ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

९ सप्टेंबर २०१० रोजी उल्हासनगर येथील ४३ वर्षीय प्रतिष्ठित व्यवसायिक धर्मेंद्र बजाज हे नेवाळी नाक्यावरच्या एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या काही मित्रांसोबत गेले होते. तिथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मिर्चू शर्मा आणि त्याच्या दोन साथीदारांनी जुन्या वादातून बजाज यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बजाज यांना चार गोळ्या लागल्या. त्यात या गोळ्या त्यांच्या डाव्या खांद्यावर आणि पोटाच्या उजव्या व डाव्या बाजूला लागल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी