ठाणे

उल्हासनगरात ऑन ड्युटी पोलिसाची तडीपार गुंडाने पकडली कॉलर

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची तडीपार गुंडाने कॉलर पकडून हुज्जत घातल्याची घटना...

Swapnil S

उल्हासनगर : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची तडीपार गुंडाने कॉलर पकडून हुज्जत घातल्याची घटना घडली आहे. आता याप्रकरणी तडीपार गुंड सूरज उर्फ मॉन्टी अशोक संदनशिवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड हे आयडिया कंपनीजवळ गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी सूरज उर्फ मॉन्टी अशोक संदनशिव हा मिळून आला. परंतु त्याने थेट पोलिसाशी हुज्जत घालून थेट कॉलर पकडली. यानंतर इतर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. मॉन्टी हा सराईत गुन्हेगार असून तडीपार असताना देखील शहरात बिनधास्त फिरत होता. त्याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आता याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲक्वा लाईन मेट्रोमुळे बेस्टचे प्रवासी घटले! प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी अधिक गाड्या सोडण्याच्या विचारात प्रशासन

रुपाली चाकणकरांविरोधात वंचितचा मोर्चा; पोलिसांकडून मारहाण, वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा गंभीर आरोप

मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण नाहीच; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

गायींच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर! सहा महिन्यांपासून अनुदान थकीत; गोशाळांची दमछाक

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे तासभर ठप्प; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल