संग्रहित छायाचित्र पीटीआय
ठाणे

मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी बारा दिवस घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ८ ते २० जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार असून वाहनांना पर्यायी

मार्गाने वळवण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे.

घोडबंदर मार्गावर मेट्रो -४ मार्गिकेचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मेट्रो स्थानक उभारणीचीही कामे सुरू आहेत. अशाचप्रकारे गायमुख येथील मेट्रो स्थानक उभारणीचे काम सुरू असून त्याठिकाणी गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेने ८ ते २० जानेवारी या कालावधीत रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूकीला बंदी घातली आहे. नागलाबंदर सिग्नल ते इडियन ऑईल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा याठिकाणी हे वाहतूक बदल लागू करण्यात आलेले आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश