ठाणे

भाजपाकडून शालेय विद्यार्थ्यांना मदत

यावेळी भरपावसात पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शंकर जाधव

डोंबिवली : भाजपाकडून शालेय विद्यार्थ्यांना मदत कोरोना महामारीनंतर आर्थिक स्थितीने कंबरडे मोडल्याने सर्वसामान्य जनतेसाठी भाजपने मदतीला हात पुढे केला आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य विकत घेण्यासाठी पैसा पुरत नसल्याने अश्या विद्यार्थ्यांना डोंबिवलीत भाजपच्या सर्व कार्यालयात मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

डोंबिवली पश्चिमेला सम्राट हॉटेलजवळील भाजप जनसंपर्क कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी भाजपचे डोंबिवली पश्चिम पदाधिकारी हरीश जावकर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भरपावसात पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर डोंबिवली पश्चिमेकडील अंबिकानगर येथील भाजप कार्यालयात डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस समीर चिटणीस व पदाधिकाऱ्यांनीहि गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. गरीब विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हात असल्याने पालकवर्गांनी भाजपचे आभार मानले.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला