ठाणे

उल्हासनगरात नंग्या तलवारी नाचवत दोघांवर प्राणघातक हल्ला

या घटनेनंतर उल्हासनगर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कायदा सुव्यवस्थेला फाट्यावर मारत काही तरुणांनी नंग्या तलवारी नाचवत दोन व्यक्तींवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर उल्हासनगर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून, या घटनेत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सोमवारी सर्वत्र श्रीराम उत्सव साजरा होत असताना उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील धोबीघाट रोड शितलामाता मंदिरजवळ आरोपी दिनकर फुंदे याने कट रचून ज्योती फुंदे, शिवम फुंदे, मित्र प्रथमेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळुन प्रमोद अगरवाल आणि मुकेश अगरवाल यांच्यावर तलवार लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लखन पाटील याने काही दिवसांपूर्वी दिनकर फुंदे यांच्यावर हल्ला केला होता, तेव्हा प्रमोद अगरवाल यांनी लखन याला जामीन दिला होता. त्याचा राग मनात असल्याने फुंदे कुटुंबीयांनी हा हल्ला केल्याचे प्रमोद अगरवाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

राज्यात नवरात्रोत्सवाची धूम; ठाण्यात बाजारपेठांमध्ये गर्दी

भिवंडीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

राज्यांच्या ‘हमी खर्चा’त २.५ पटीने वाढ; ‘कॅग’च्या अहवालात ठपका

आरक्षणाच्या राजकारणात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष