ठाणे

शहरातील साफसफाईच्या कामाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

प्रतिनिधी

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी शहरातील विविध भागांना भेटी देवून परिसर सुशोभिकरण, रस्ते दुरुस्ती, गटर्स आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण, उप आयुक्त शंकर पाटोळे, उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, उप नगर अभियंता गुणवंत झांबरे, आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी हळदेकर तसेच सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी आनंदनगर परिसरात घनकचरा संकलनाचे वेळापत्रक स्थानिक परिस्थितीनुसार निश्चित करणे, दत्ताजी साळवी उद्यानासमोरील पदपथावर असलेली माती उचलणे, उद्यानासमोरील रस्ता व पदपथाची साफसफाई करणे, आनंदनगर ठामपा प्रवेशद्वारावर ठामपाचा लोगो ठळकपणे प्रदर्शित करणे, ज्ञानसाधना कॉलेजसमोरील नाल्यातील कचरा काढून घेणे, ज्ञानसाधना कॉलेज ते तीन हात नाका सेवा रस्त्याची नियमितपणे साफसफाई करुन घेणे, मा. बाळासाहेब ठाकरे स्मारक समोरील स्टॅक पार्किंग त्वरीत सुरु करणे तसेच बाळासाहेब ठाकरे मुख्य प्रवेशद्वार वॉटर प्रुफींग करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधितांना दिले.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

एच. डी. रेवण्णा एसआयटीच्या ताब्यात,राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र!

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?