इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम 
ठाणे

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांवर जाणवू लागले आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने पोळी-भाजी केंद्रांवर भाजी, भाकरी आणि चपातीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. पोळी-भाजी केंद्रांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

Swapnil S

ठाणे: इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांवर जाणवू लागले आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने पोळी-भाजी केंद्रांवर भाजी, भाकरी आणि चपातीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. पोळी-भाजी केंद्रांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी हॉटेल-पोळी-भाजी केंद्रांवर व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, भाजीपाल्याचे वाढते दर, खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे पोळी-भाजी केंद्रासह ग्राहकांनाही जबर फटका सहन करावा लागत आहे.

पोळी- भाजी केंद्रात चपाती ७ रुपयांपासून १० रुपये, भाकरी २० रुपयांवरून २५ रुपये, १०० ग्रॅम भाजी ४० रुपयांपासून ६० ते ७० रुपये, रस्साभाजी ५० ते ६० रुपयांवर दर गेले आहेत. दिवसभर काम केलेला कामगार दुपारी पोळी-भाजी केंद्रात अथवा खाणावळीत जेवायला जातो तेव्हा ८० ते १०० रुपयांची थाळी १२० ते १५० रुपयांवर गेल्याचे समजल्याने त्यांच्या खिशाला चाट पडत आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई वाढत आहे. त्यातच आखाती देशांतील युद्धाचा थेट परिणाम गृहिणींच्या स्वयंपाकाला आणि पोळीभाजी व्यावसायिकांना भोगावे लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पोळी -भाजी केंद्रांवर वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम फुटत आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन