कल्याण अपघात; मिक्सर चालकाला अटक; नागरिकांनी अवैध वाहनातून प्रवास करू नये- RTO  संग्रहित छायाचित्र
ठाणे

कल्याण अपघात; मिक्सर चालकाला अटक; नागरिकांनी अवैध वाहनातून प्रवास करू नये- RTO

ठाणे जिल्ह्यात एका गर्दीने खचाखच भरलेल्या व्हॅनची सिमेंट मिक्सर ट्रकशी टक्कर होऊन ११ जणांचा बळी घेणाऱ्या अपघातप्रकरणी पोलिसांनी सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली असून, नागरिकांनी अनधिकृत वाहनांमधून प्रवास करू नये, असे आवाहनही केले आहे.

Swapnil S

कल्याण : ठाणे जिल्ह्यात एका गर्दीने खचाखच भरलेल्या व्हॅनची सिमेंट मिक्सर ट्रकशी टक्कर होऊन ११ जणांचा बळी घेणाऱ्या अपघातप्रकरणी पोलिसांनी सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली असून, नागरिकांनी अनधिकृत वाहनांमधून प्रवास करू नये, असे आवाहनही केले आहे.

स्थानिकांना 'शटल टॅक्सी' सेवा पुरवणारी ही व्हॅन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने जात असताना, सोमवारी सकाळी उल्हास नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावर समोरून येणाऱ्या 'ट्रान्झिट मिक्सर'शी तिची समोरासमोर टक्कर झाली. सिमेंट मिक्सर चालवणारा कमलेश यादव (२६) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी दिली.

अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा

या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, वेगमर्यादेवर नियंत्रण, अपघातग्रस्तांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणे व एसटी बससेवा वाढवणे, अशा ठोस उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी होत आहे.

यंदा सोनेरी सण! सोन्याच्या घसरलेल्या दरांमुळे मागणीत वाढ; सणासुदीच्या हंगामासाठी अपेक्षा उंचावल्या

Mumbai : मराठीत OTP सांगितल्यामुळे संतापला कॅबचालक; प्रवाशासोबत घातली हुज्जत, VIDEO व्हायरल

BMC Gen Z Fellowship 2026 : पालिकेच्या कारभारात आता Gen Z चा सहभाग! ५० तरुणांना मिळणार कामाची संधी, कसं कराल अप्लाय?

Ulhasnagar : नारळ फुटला, रस्ता खोदला; पण मुहूर्त कधी? भूमिपूजनाचा गाजावाजा; कामाला सुरुवात अन् ठेकेदारच गायब!

सोसायटी-गृहसंकुलात बकरी पालन, कुर्बानीला बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा महासभेत भाजपचा ठराव