ठाणे

विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल; चार दिवसांची पोलीस कोठडी

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका टिटवाळा पोलिसांनी सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी याच्यावर ठेवला होता.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अनिश दळवी या विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अनिशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका टिटवाळा पोलिसांनी सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी याच्यावर ठेवला होता. याप्रकरणी ऑलविन अँथोनी याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. ऑलविन अँथोनी याला शुक्रवारी १२ तारखेला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका विद्यार्थिनीसंदर्भात अनिशने आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. शाळा प्रशासनाने पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनिशला बोलावून बेदम मारहाण करत तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल अशी ताकीद देत घरी पाठवले. याचाच धसका घेत अनिशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली