कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम 
ठाणे

कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी, २ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी, २ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा ‘अल निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण भागातील इतर गावे या सर्व परिसरांतील नागरिकांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण