ठाणे

नवमतदार महायुतीलाच मतदान करतील

कल्याण लोकसभा मतदारसंघ मिळून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व - पश्चिम, डोंबिवली, कळवा, मुंब्रा असे सहा मतदारसंघ आहेत. यात २२,१७९ नवमतदार असून यांचे मत महायुतीलाच मिळतील असे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण २०,१८,९५८ मतदार असून यात ७३८ तृतीयपंथी, १०,८०२ दिव्यांग, २२,१७९ नवमतदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत नवमतदार हा महायुतीलाला मतदान करील असा विश्वास शिवसेना (शिंदे गट) युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कल्याण लोकसभा मतदारसंघ मिळून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व - पश्चिम, डोंबिवली, कळवा, मुंब्रा असे सहा मतदारसंघ आहेत. यात २२,१७९ नवमतदार असून यांचे मत महायुतीलाच मिळतील असे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, २०१४ व २०१९ साली ज्याप्रमाणे निवडणुकीत सामोरे गेलो होतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा काय आहे हे सर्वाना माहिती आहे. कुठल्याही उमेदवाराला कमी न लेखत रणनीतीनुसार लोकसभेत काम सुरू आहे. आम्ही केलेल्या कामावर लोकांचा विश्वास आहे. सर्वसमान्यमध्ये जाऊन काम करणारे डॉ. श्रीकांत शिंदे आहे.

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद

Iran vs US-Israel War : युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव; इराणसमोर ठेवल्या 'या' १५ अटी

Navi Mumbai : भोंदूगिरीतील पैशांचे शिरढोण कनेक्शन उघड; पनवेलमध्ये कोट्यवधींच्या जमीन व्यवहारांवर संशय