ठाणे

विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, टिकली, राखीला बंदी; कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा

कल्याण येथील गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांवर एक विचित्र फतवा काढत कपाळावर टिळा, टिकली लावणे तसेच हातात राखी बांधण्याला बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने या प्रकरणी शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे.

Swapnil S

कल्याण : येथील गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांवर एक विचित्र फतवा काढत कपाळावर टिळा, टिकली लावणे तसेच हातात राखी बांधण्याला बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने या प्रकरणी शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे.

विद्यार्थ्यांना धार्मिक ओळख दाखवणारे टिळा-टिकली लावू नये, असा नियम शाळेने लादल्याने अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली असून सक्ती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. माझ्या मुलालाही हा नियम लागू केला गेला, याबाबत मुख्याध्यापकांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. जर शाळेने पुन्हा असा फतवा काढला, तर शिवसेनेमार्फत आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी दिला आहे.

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

Pune : "मॅडम, तुम्ही ड्रिंक केलीये का? नाही...मी दारू पिलीये"; मद्यधुंद महिला पोलिसाची उलट्या दिशेने ड्रायव्हिंग, Video व्हायरल होताच निलंबन

आरटीओंना नोटीस; HSRP बसविण्यात दिरंगाई भोवणार

डिजिटल फसवणूक; पीडितांना पूर्ण भरपाई - सुप्रीम कोर्ट

‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन