ठाणे

Kalyan Station: कल्याण स्थानकावर धावत्या रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न जीवावर बेतला ; दोन भावंडांपैकी एकाचा मृत्यू तर गंभीर जखमी

कल्याण स्थानकावर शुक्रवार (६ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नवशक्ती Web Desk

कल्याण रेल्वे स्थानकावर एक दुर्देवी घटना घडली आहे. यात एका जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेल्वेतून उतरताना ही घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून खाली उतरताना एका व्यक्तीचा तोल गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. कल्याण स्थानकावर शुक्रवार (६ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मरण पावलेला व्यक्ती आणि गंभीर जखमी असलेला व्यक्ती भाऊ भाऊ असल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्याहून मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही कल्याण स्थानकावर थांबत नाही. तर या एक्स्प्रेसचा वेग कल्याण स्थानकावर कमी होतो. या कारणामुळे या स्थानकावर काही जण धावती ट्रेन पकडण्याचा किंवा ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करतात. आजच्या दुर्दैवी घटनेत देखील दोघे जण हे कल्याण स्थानकावर ट्रेनची गती कमी झाली असता उतरण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी तोल गेल्याने दोघी खाली कोसळले. त्यात एकाचा करुण अंत झाला आहे. तर दुसरा गंभरी जखमी आहे.

या घटनेनंतर जमावाने गर्दी केली. रेल्वे पोलीस देखील माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जीआरपीएफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही दुर्वैवी घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जात गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विदर्भात पावसाचे थैमान; चंद्रपूर जिल्ह्यातही धूमशान; नदी-नाले तुडुंब, अनेक मार्ग बंद

गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या! उद्धव ठाकरे यांची मागणी

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अखेर मान्य; अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पगार जमा होणार - गिरीश महाजन

तुकडेबंदी कायदा शिथिल; ५० लाख शेतकऱ्यांना दिलासा

Guru Purnima Wishes 2025 : तुमच्या गुरूंना पाठवा खास मराठी शुभेच्छा, WhatsApp स्टेटस आणि Quotes!