KDMC शाळांमध्ये लवकरच अभ्यासिका; मुंबई पालिका शाळांच्या धर्तीवर उपक्रम 
ठाणे

KDMC शाळांमध्ये लवकरच अभ्यासिका; मुंबई पालिका शाळांच्या धर्तीवर उपक्रम

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) शाळांमध्येही अभ्यासिका सुरू करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण समितीचे सभापती अभिजित थरवळ यांनी दिली.

Swapnil S

डोंबिवली : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) शाळांमध्येही अभ्यासिका सुरू करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण समितीचे सभापती अभिजित थरवळ यांनी दिली.

मुंबईतील पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढावी, वाचनाची सवय लागावी आणि ज्ञानवृद्धी व्हावी यासाठी अभ्यासिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच धर्तीवर केडीएमसी शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे थरवळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या अभ्यासिकांमध्ये विविध ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामधून विद्यार्थ्यांना महान व्यक्तींची चरित्रे, ऐतिहासिक घटना, विज्ञान, सामाजिक घडामोडी आणि विविध विषयांची माहिती वाचनाद्वारे मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अभिजित थरवळ म्हणाले की, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी सर्व शिक्षकांची बैठक घेऊन विविध उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. त्यातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे शाळांमध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण समितीतील सर्व सदस्यांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही थरवळ यांनी सांगितले.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा