ठाणे

केतकी चितळेला नवी मुंबई पोलिसांनी अॅट्रोसिटीच्या गुन्ह्या अंतर्गत केली अटक

प्रतिनिधी

बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली आहे. शुक्रवारी केतकीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे केतकीच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मार्च २०२०मध्ये केतकी चितळे हिने फेसबुकवरुन बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर काही आंबेडकर विचारवादी कार्यकर्त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलीस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले. तर, याप्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी केतकीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू