ठाणे

निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी ‘सोशल मीडिया’ आधुनिक प्रचारदूत; फोटो, व्यंगचित्र, व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार

Swapnil S

दीपक भिसे /जव्हार

जव्हार तालुका हा आदिवासी, ग्रामीण तथा दुर्गम भाग जरी असला तरी इंटरनेटमुळे जगातील सर्व हालचाली ज्ञात होत आहेत. या सगळ्यांत आपुलकीचा विषय ठरत असलेले माध्यम म्हणजे सोशल मीडियावर रमणे अगत्याचे झाले असल्याने, लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय नेते जागतिक क्रांती ठरलेल्या इंटरनेटवरील सोशल मीडियाचा वापर हा आधुनिक प्रचारदूत या भावनेने करीत आहे, यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला आहे.

पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, चौक सभा यांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही. तथापि फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांतून लोकसभेच्या उमेदवारांचे समर्थक पोस्ट टाकत आहेत. सोशल मीडिया म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारदूतच बनला आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव पडणार आहे. म्हणूनच निवडणूक आयोगानेही यावर नजर ठेवण्याची तयारी केली आहे. परंतु, राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट टाकण्याचा सपाटा लावला आहे. मतदारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकतर्फी भडिमार होऊ शकतो. सोशल मीडियाचा योग्य उमदेवाराची सोशल मीडियाचा योग्य उमदेवाराची निवड करताना उपयोग होऊ शकतो. यासाठी सोशल मीडियाला एक व्यासपीठ बनिवता येईल, शिवाय, लोकशाहीच्या मंदिरात स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार या माध्यमातून आपली दावेदारी सादर करू शकतात.

आज सोशल मीडिया राजकीय पक्षासाठी एक नवे साधन म्हणून पुढे आले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता सोशल मीडियावर राजकीय पक्षाची सक्रियता बघायला मिळत आहे. मतदान जवळ आल्यानंतर सोशल मीडियावरील प्रचाराचा भडीमार अधिक वाढणार आहे. विविध प्रकारचे फोटो, व्यंगचित्र, व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार करीत आहेत. सोशल मीडियावरील राजकीय पोस्टर नजर ठेवणे अवघड आहे. त्यामुळे मतदारांत संभ्रम वाढण्याची शक्यता आहे. अनेकांनी राजकीय पोस्ट टाकणाऱ्यांना आपल्या यादीतून डिलीट करणे सुरू केले आहे.

थेट मतदारांशी संपर्काचे साधन!

निडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर प्रत्येक तिसरा मेसेस हा राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याशी निगडित आहे. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचार जवळपास लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. त्याची जागा पूर्णपणे सोशल मीडियाने घेतली आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले सोशल मीडिया सेल वर्षभर आधीपासूनच कार्यान्वित केले. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे. ही सगळी आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तसेच चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तरोत्तर हायटेक प्रचाराचा फंडा वाढत जाईल, यात शंका नाही.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही