संग्रहित छायाचित्र 
ठाणे

मनसेमुळे ठाण्यात मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार? राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे सस्पेन्स कायम

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष उमेदवारांची यादी तयार करण्यात व्यस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच मनसेमुळे मुख्यमंत्र्यांचीच डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Swapnil S

अतुल जाधव / ठाणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष उमेदवारांची यादी तयार करण्यात व्यस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच मनसेमुळे मुख्यमंत्र्यांचीच डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. मनसेने ठाण्यातील चारही मतदारसंघांत आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांसमोरच मनसेचे अभिजीत पानसे यांच्या नावाची चर्चा असून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश मास्के यांच्यासाठी जाहीर सभा देखील घेतली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आता मनसेने एकला चलोचा नारा दिल्याने यामुळे ठाण्यात शिवसेनेची पुरती कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

ठाण्यातील या चार जागांवर मनसे उमेदवार?

ठाण्याच्या चारही जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी ठाणे शहराचा दौरा केला. त्यावेळी ते या संदर्भात काही महत्त्वाची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु राज ठाकरे यांनी या संदर्भात मौन बाळगल्याने राज ठाकरे या संदर्भात काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यात आहे.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती