ठाणे

साडेपाच हजार घरांची लॉटरी; ठाणे-पालघर-रायगडमधील अर्जदारांची उत्सुकता शिगेला, 'या' दिवशी सोडत

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या...

Swapnil S

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी प्राप्त २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत शनिवार २४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

१५ सप्टेंबर, २०२३ रोजी कोकण मंडळाच्या अखत्यारीतील ५३११ सदांनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. या सोडतीसाठी आतापर्यंत एकूण ३१८७१ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह २५०७८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २२७८ सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणाऱ्या या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याठिकाणी पहा थेट सोडत

अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक