Photo Credit: Prashant Narvekar
ठाणे

बदलापूरनंतर कळवा रुग्णालयाच्या आवारात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेवरून जिल्ह्यात रणकंदन पेटले असताना कळवा येथे अल्पवयीन दिव्यांग मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्याने ठाणे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

Swapnil S

ठाणे : बदलापूर येथे एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेवरून जिल्ह्यात रणकंदन पेटले असताना कळवा येथे अल्पवयीन दिव्यांग मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्याने ठाणे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास कळवा पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शेळके (४२) असे त्या नराधमाचे नाव असून एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे. आईसोबत सोमवारी कळवा रुग्णालयात आलेली ११ वर्षीय पीडित मुलगी रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्याचवेळी नराधम प्रदीप याने त्या मुलीला त्या ठिकाणच्या उद्यानात नेले. तेथे तो मुलीशी अश्लील चाळे करत असताना ही बाब एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या निदर्शनास आली.

दरम्यान, रुग्णालया परिसरात डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्या नातेवाईकाने त्या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीपला चोप देत ताब्यात घेतले. तसेच, या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी प्रदीप याला अटक केली.

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा

बंदची अधिसूचना, पण शहाड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूच; पहिल्या दिवशी डांबरीकरणाचे काम सुरू नाहीच