ठाणे

कल्याण लोकसभेची मनसेची तयारी - राजू पाटील

शिवसेना-भाजप वादाबद्दल त्यांना विचारले असता, पहिले हे लोक एकत्र लढलेले; मात्र त्यात अजून एक गट सामील झाला. लोकसभा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल. पालिका लेव्हललाही या गोष्टी घडणार, त्यावेळेला यांची युतीही नसेल, असे राजू पाटील सांगितले.

Swapnil S

कल्याण : तयारी आमची नेहमीच असते, मी स्वतः कल्याण लोकसभा निवडणूक लढलो आहे. या लोकसभेची बांधणी कशी आहे, दाटणी कशी आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आदेश दिला आणि आम्ही तयार नाही, असे व्हायला नको म्हणून कल्याण लोकसभेसाठी मनसेची तयारी असून, आदेश आल्यास निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मनसे आमदार राजू पाटील यांनी दिले आहेत.

तर मनसे पक्षाशी गद्दारी केलेल्यांना आम्ही मदत करणार नसल्याचे सांगत वैशाली दरेकर यांना मदत करणार नसल्याचे सांगितले. कल्याण लोकसभा क्षेत्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी राजू पाटील बोलत होते.

शिवसेना-भाजप वादाबद्दल त्यांना विचारले असता, पहिले हे लोक एकत्र लढलेले; मात्र त्यात अजून एक गट सामील झाला. लोकसभा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल. पालिका लेव्हललाही या गोष्टी घडणार, त्यावेळेला यांची युतीही नसेल, असे सांगितले.

राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचं बोलतील

मनसे महायुतीत जाणार की नाही, याबाबत पाटील यांना विचारले असता, गुढीपाडव्याचा मेळाव्याला राज ठाकरे दिशा देणार आहेत. ते काय बोलतील हे शर्मिला वहिनी देखील सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय सांगू; मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील, त्याची गॅरंटी आम्हाला असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

पुनर्विकास प्रकल्पास उपनिबंधकाचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' अनावश्यक; ७९ (अ) अंतर्गत मुरलेल्या भ्रष्टाचाराला उच्च न्यायालयाचा सुरुंग

औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती संभाजीनगर'

पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात; संरक्षण मंत्र्यांचा इशारा

IND vs AUS : रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून

Women’s World Cup : गोलंदाजीत सुधारणा करण्याचे आव्हान; भारताची आज इंग्लंडशी गाठ