Thane : खड्ड्यांवरून मनसेचे ठिय्या आंदोलन; लोकांच्या जीवाशी खेळ थांबवण्याचा MNS चा इशारा (Photo-Facebook/@RavindraMoreMNS)
ठाणे

Thane : खड्ड्यांवरून मनसेचे ठिय्या आंदोलन; लोकांच्या जीवाशी खेळ थांबवण्याचा MNS चा इशारा

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

Swapnil S

ठाणे : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. श्री मामा बालनिकेतन ते आनंदनगर-मुलुंड चेकनाका परिसरातील खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. खड्डे न बुजवल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेचे पदाधिकारी रवी मोरे यांनी दिला.

खड्ड्यांमुळे एका मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच मनसे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत रस्त्याची दुरवस्था समोर आली.

तातडीने रस्ते दुरुस्त करा!

पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. वेळेत कारवाई न झाल्यास मनसेकडून आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती