ठाणे

मच्छीमार बांधवांच्या होड्या किनारी

रायगड जिल्ह्यामधील सुमारे दहा हजारपेक्षा जास्त होड्या होळी सण साजरा करण्यासाठी सागरीकिनाऱ्याला येत असून सदरचा सण मोठ्या उत्सहात साजरा करीत असतात.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : सुमारे ३२० किलोमीटरचा सागरीकिनारा रायगड जिल्ह्याला लाभला असून सागरकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचा प्रमुख व्यवसाय हा मच्छिमारीचा आहे. लाखो कुटुंब या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मुरूड तालुक्यात लहान व मोठ्या अशा सातशेपेक्षा जास्त होड्या मच्छिमारी करीत आहेत. सततच्या संकटांमुळे रायगड जिल्ह्यातील कोळी समाज हा पूर्णतः हवालदिल झाला आहे.

मासळीला योग्य दर नाही,परंतु डिझेलचे दर मात्र गगनाला भिडलेले आहेत. तरी आशा बिकट परिस्थितीत सामना करीत असताना मिळेल त्या मासळीवर समाधान मानून आपले कर्तव्य निष्ठेने बजावत समाधानपूर्वक व्यवसाय करीत असताना आलेले सण उत्साहात साजरे करून चेहऱ्यावर दुःखाचे सावट न दाखवता होळी हा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे.

दहा ते बारा दिवस गावात वस्ती

रायगड जिल्ह्यामधील सुमारे दहा हजारपेक्षा जास्त होड्या होळी सण साजरा करण्यासाठी सागरीकिनाऱ्याला येत असून सदरचा सण मोठ्या उत्सहात साजरा करीत असतात. मुंबईहून मासळी करून आलेल्या सर्व होड्या आपल्या गावी परतून होळी सण एकत्र साजरा करीत असतात. किमान दहा ते बारा दिवस गावात वस्ती करून होळी साजरी करून सदरच्या बोटी पुन्हा मुंबईकडे रवाना होत असतात. मोठ्या हर्षोल्हासात होळी सण हा कोळी समाजातर्फे दरवर्षी साजरा केला जात असतो. होळीच्या सणाला कोळीवाडे भरगच्च भरलेले असतात. दुःखात असणाऱ्या व्यक्तीचा योग्य तो मानपान केला जातो. विविध सामाजिक व धार्मिक कर्तव्यातून कोळी समाज होळीचा सण आनंदात साजरा करीत असतात.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी