ठाणे

Ulhasnagar : प्रेमाला जीवघेणा विरोध; आईने केला मुलीचा खून

मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध, कडवट वाद आणि क्षणिक संतापातून घडलेली काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली. एका आईने स्वतःच्या २० वर्षीय मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना उघड झाली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध, कडवट वाद आणि क्षणिक संतापातून घडलेली काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली. एका आईने स्वतःच्या २० वर्षीय मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना उघड झाली आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील भय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या अमृता गरड (२०) हिचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला तिची आई आशा गरड हिचा तीव्र विरोध होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास याच कारणावरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी घरातील वडील आणि दोन्ही भाऊ झोपेत होते. वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना, संतापाच्या भरात आशा गरड हिने मुलीच्या ओढणीने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत अमृताचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून आरोपी आईला अटक करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट