ठाणे

मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींच्या संख्येत वाढ

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले. तर, जखमी सात प्रवाशांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सोमवारी रात्री उशिराने आणखी एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने जखमींची संख्या आठ झाली आहे.

Swapnil S

ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले. तर, जखमी सात प्रवाशांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सोमवारी रात्री उशिराने आणखी एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने जखमींची संख्या आठ झाली आहे. दुसरीकडे जखमी रुग्णांपैकी मच्छिंद्र गोतारणे या रुग्णाला मेंदूचा त्रास जाणवू लागल्याचे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर ३ रुग्णांवर मंगळवारी हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या रेल्वे अपघातात जखमी झालेल्या जितेंद्र म्हात्रे (३२) या रुग्णाला उशिराने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे जखमी प्रवाशांची संख्या ८ झाली आहे. दुसरीकडे वाशिंद येथे राहणारे मच्छिंद्र गोतारणे यांच्या डोक्याला मार लागला असल्याने मेंदूचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मंगळवारी हलविण्यात आले. तर, उर्वरित रुग्णालयात दाखल असलेल्या ७ जणांची प्रकृती स्थिर असली तरी, तीन रुग्णांवर हाडांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

दोघा जखमींपैकी एकाच्या प्रकृतीत सुधारणा, तर एक गंभीर

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या रेल्वे दुर्घटनेतील शिवा गवळी आणि अनिल मोरे या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. यामध्ये शिवा गवळी यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असून अनिल मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video