ठाणे

मुरबाड-कल्याण रस्त्याने घेतला तरुणाचा बळी

कळवा-मुरबाड महामार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याची झालेली चिखलातली दुरवस्था आता जीवघेणी ठरू लागली आहे. बुधवारी सकाळी हिंदू सेवा संघ फाटा, मुरबाड येथे चिखलात घसरून पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा डम्परच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

नामदेव शेलार

मुरबाड : कळवा-मुरबाड महामार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याची झालेली चिखलातली दुरवस्था आता जीवघेणी ठरू लागली आहे. बुधवारी सकाळी हिंदू सेवा संघ फाटा, मुरबाड येथे चिखलात घसरून पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा डम्परच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव रोहन राजेंद्र मलाह (२०) असे असून, तो जमील नगर येथे राहत होता. चिखलात साचलेल्या रस्त्यावरून जात असताना त्याची दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या डम्परचे चाक थेट डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. महामार्ग विभाग आणि कंत्राटदाराने रस्त्यावर साचलेल्या चिखलाची कोणतीही सफाई न केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर कोणतेही सुरक्षा उपाय, दिशादर्शक फलक, पर्यायी मार्ग वा वाहतूक नियंत्रण नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या प्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करावी, मृताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

Nirmala Sitharaman : GST कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले

मराठा GR मुळे किती जणांना मिळाले प्रमाणपत्र? राधाकृष्ण विखे-पाटलांना घेराव

पाटोळे लाच प्रकरणात तक्रारदारांना धमकी; ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'तो' GR रद्द करण्याची जबाबदारी आता भुजबळांची; विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

पुन्हा एकदा भर न्यायालयात बूटहल्ला