ठाणे

"रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी..." नरेश म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ

प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी ठाण्यामधील एका कार्यक्रमात त्यांनी पवार कुटुंबामध्येच मतभेद असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

याचवर्षी जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे उभे होते, तर त्यांच्याविरोधात अभिषेक बोके हे उभे होते. अभिषेक बोके हे शरद पवार यांच्या बहिणीचे नातू आहेत. या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांचा विजय झाला होता. यावरून बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, "अजित पवार हे एमसीए निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचे निरोप सगळ्यांना देत होते. त्यामुळे आधी आपल्या घरात बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा," अशी खोचक टीका यावेळी नरेश म्हस्के यांनी केली.

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?