बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण : नाशिकच्या डॉक्टरला बेड्या प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण : नाशिकच्या डॉक्टरला बेड्या

बदलापूर शहरात उघडकीला आलेल्या बेकायदेशीर स्त्री बीज विक्री प्रकरणी आता नाशिक येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा या डॉक्टरला अटक करण्यात आली असून ही या प्रकरणातील सहावी अटक आहे.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर शहरात उघडकीला आलेल्या बेकायदेशीर स्त्री बीज विक्री प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. या प्रकरणी आता नाशिक येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा या डॉक्टरला अटक करण्यात आली असून ही या प्रकरणातील सहावी अटक आहे.

अवैधरित्या स्त्री बीज विक्रीचे प्रकरण बदलापुरात समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील गुन्हेगारांच्या अटक करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणी नाशिक येथील डॉक्टरला अटक केली. त्याला चिखलोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तीन महिला, औषध विक्रेत्याला अटक

पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी तीन महिलांना व एका औषध विक्रेत्याला अटक केली आहे. त्यातील एक महिला सोनोग्राफी केंद्रात काम करीत होती. तर विठ्ठलवाडी येथील विक्रेता कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्त्री बीजासंबंधीची औषधे देत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात डॉक्टरांचाही सहभाग आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज

Navi Mumbai : 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा! पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकाला ८ दिवसांत १.५४ कोटींचा गंडा

Nashik : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर

Chandrapur : मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून प्रेयसीची हत्या अन् केला आत्महत्येचा बनाव; आरोपी प्रियकर अटकेत

Mumbai : 'पिंक टॉयलेट'मध्येच कॅफे! फॅशन स्ट्रीटजवळील प्रकार उघड; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह, Video