ठाणे

Thane : भाड्याने वाहने लावण्याचे प्रलोभन दाखवणारा भामटा जेरबंद; २.४४ कोटींची ३२ चारचाकी वाहने जप्त

वाहने मासिक भाड्याने लावण्याचे प्रलोभन दाखवत वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नवीमुंबई, उलवे येथील संदीप रघु शेट्टी (वय ३८) याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र. ५ ने अटक केली.

Swapnil S

ठाणे प्रतिनिधी : वाहने मासिक भाड्याने लावण्याचे प्रलोभन दाखवत वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नवीमुंबई, उलवे येथील संदीप रघु शेट्टी (वय ३८) याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र. ५ ने अटक केली. या कारवाईत तब्बल रु. २ कोटी ४४ लाख १५ हजार रुपये किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून आणखी वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या पाच चारचाकी वाहनांना आरोपी संदीप रघु शेट्टी याने जास्त मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून ताब्यात घेतले. मात्र, आरोपीने वाहनांचे कोणतेही भाडे न देता ती वाहने परतही केली नाहीत. उलट संबंधित वाहने इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून आर्थिक फायदा मिळवत वाहनांचा अपहार केल्याचे तपासात समोर आले. गुन्ह्यानंतर आरोपी स्वतःची ओळख लपवून राहत होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपीने अनेक वाहनमालकांना जास्त भाड्याचे आमिष दाखवून वाहने ताब्यात घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत विविध ठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण व परभणी येथून एकूण ३२ चारचाकी वाहने जप्त केली. या प्रकरणात आणखी पीडित समोर येण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व सह पोलिस आयुक्त (शोध-१ गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ५ वागळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहायक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील तसेच त्यांच्या पथकाने केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Thane : पाण्यात उतरलेल्या करंटमुळे १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांकडून निष्काळजीपणाचा आरोप

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई