ठाणे

Thane : ...तर अजित पवार गटाला विरोधी पक्षनेतेपद देऊ! विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाचे मत

राज्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाहीत, यावरुन खलबते सुरू आहेत. परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्षनेत्याच्या मुद्यावरुन दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विलीनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळ प्रसंगी विरोधी पक्षनेतेपद देऊ, असे सुचक वक्तव्य राष्ट्रवादी (शरद पवार ) जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आहे.

Swapnil S

ठाणे : राज्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाहीत, यावरुन खलबते सुरू आहेत. परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्षनेत्याच्या मुद्यावरुन दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विलीनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळ प्रसंगी विरोधी पक्षनेतेपद देऊ, असे सुचक वक्तव्य राष्ट्रवादी (शरद पवार ) जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आहे. परंतु विलीनीकरण झाले नाही तर मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे आमचेच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेची महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ठाणे महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण होणार यावरुन पालिका वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५ चे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु या तीनही पक्षांनी आपली नोंदणी स्वतंत्र केलेली आहे. त्यामुळे महापालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी (शरद पवार) हाच ठरत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे आम्हालाच मिळायला हवे अशी स्पष्ट भुमिका आता राष्ट्रवादी (शरद पवार) ने घेतली आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी आम्हाला विरोधी पक्षासाठी दोनही पर्याय खुले असल्याचे मत जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा पक्ष मोठा असल्याने त्यावर दावा हा आमचाच असेल अशी भुमिका शरद पवार गटाने घेतली आहे. परंतु वेळ प्रसंगी दोनही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर नक्कीच आम्ही मुल्ला यांना विरोधी पक्षनेते पद देऊ असेही प्रधान म्हणाले.

तीनही पक्षांची स्वतंत्र नोंदणी

कोकण विभागाकडे राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एमआएम या तीनही पक्षांनी स्वतंत्र नोंदणी केली आहे. परंतु यात राष्ट्रवादी (शरद पवार ) चे नगरसेवक अधिकचे असल्याने विरोधी पक्षनेते पद नियमानुसार त्यांच्याकडे जाऊ शकणार आहे. परंतु राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एमएआयएमने एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना सुरवातीला विलीनीकरण करावे लागेल. तेव्हाच त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळू शकते असे जाणकरांचे म्हणणे आहे.

Mumbai : मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; 'या' ठिकाणी मिळणार त्वरित मदत

Thane : पाणीटंचाई टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा आधार; उन्हाळ्यात कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या वापराचा निर्णय

लाडकी बहीण योजना : e-KYC मुदत वाढली, पण सर्वांसाठी नाही; फक्त 'या' महिलांनाच मिळणार संधी, संकेतस्थळावर दिला स्पष्ट संदेश

Mumbai : थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस...अन्यथा कायदेशीर कारवाई; डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा

ज्येष्ठांच्या पालनपोषणाचा कायदा म्हणजे मालमत्तेतून बेदखल करण्याचा पर्याय नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा