ठाणे

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक वाढीचा राष्ट्रवादीचा संकल्प?

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढणार यावर अजून शिक्कामोर्तब झाले नाही

प्रतिनिधी

ठाणे महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असताना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढणार यावर अजून शिक्कामोर्तब झाले नाही. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सभागृहात नगरसेवक वाढीचा संकल्प केला आहे. ठामपाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २३ ने वाढवून ५९ वर नेण्याचा निर्धार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, उपस्थित कार्यकर्त्याकडून परांजपे यांच्या या निर्धाराचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे, पालघर महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नवा संकल्प केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापनदिन सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ऋताताई आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या ध्वजाचे आरोहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आनंद परांजपे यांनी शुक्रवारी आपण पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त एकत्र आलो आहे.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

संजय राऊत मानहानी प्रकरण : नारायण राणेंना धक्का; समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर