NEET पेपरफुटीविरोधात आंदोलनाला बळ; भिवंडी, उरण, कल्याण-डोंबिवली, पोलादपूरमध्ये निदर्शने 
ठाणे

NEET पेपरफुटीविरोधात आंदोलनाला बळ; भिवंडी, उरण, कल्याण-डोंबिवली, पोलादपूरमध्ये निदर्शने

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडी, उरण, कल्याण-डोंबिवली, पोलादपूरमध्ये निदर्शने करण्यात आली.

Swapnil S

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडी, उरण, कल्याण-डोंबिवली, पोलादपूरमध्ये निदर्शने करण्यात आली.

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचे आंदोलन

कल्याण/डोंबिवली : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ कल्याण आणि डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कल्याण येथे जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. डोंबिवलीत स्व. इंदिरा चौक येथे जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

भिवंडीत तिरंगा रॅली

भिवंडी : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शांतीनगर परिसरात ‘एक देश, एक भावना’ या घोषवाक्याखाली तिरंगा रॅली काढण्यात आली.

हजारो युवक-युवती हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, तृतीयपंथीय समुदायानेही मोठ्या संख्येने सहभाग घेत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडी, वंचितची निदर्शने

उरण : नीट परीक्षा पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसह जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. शिक्षणाचे खासगीकरण रोखून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली.

आंदोलनात विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि कामगार सहभागी झाले.

पोलादपूरमध्ये लाठीमाराचा निषेध

पोलादपूर (शैलेश पालकर) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पोलादपूर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.

‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती