ठाणे

नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला ११८ वर्षे पूर्ण; ऐतिहासिक ठेव्याची उपेक्षा, पर्यटकांची नाराजी, १६ एप्रिल १९०७ रोजी पहिली टॉय ट्रेन धावली

नेरळ ते माथेरानदरम्यान धावणाऱ्या जगप्रसिद्ध टॉय ट्रेनला बुधवारी ११८ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक घटनेनिमित्त कोणताही औपचारिक कार्यक्रम रेल्वे प्रशासनाने न घेता उपेक्षा केल्याने अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Swapnil S

चंद्रकांत सुतार / माथेरान

नेरळ ते माथेरानदरम्यान धावणाऱ्या जगप्रसिद्ध टॉय ट्रेनला बुधवारी ११८ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक घटनेनिमित्त कोणताही औपचारिक कार्यक्रम रेल्वे प्रशासनाने न घेता उपेक्षा केल्याने अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाचा प्रारंभ के. सर आदमजी पीरोभाय (के. अब्दुल हसन आदमजी पीरोभाय) यांनी १९०१ साली केला आणि १६ एप्रिल १९०७ रोजी पहिली टॉय ट्रेन धावली. त्याकाळी त्यांनी या प्रकल्पासाठी १६ लाख रुपये खर्च केले होते. आजच्या सोन्याच्या दरानुसार या प्रकल्पाची मूल्यवत्ता कोट्यवधी रुपयांच्या घरात जात असल्याची जाणीव असणे गरजेचे आहे.

आजही नेरळ आणि माथेरानमध्ये हजारो पर्यटक या ट्रेनचा आनंद घेतात. आजच्या दिवशी रेल्वेने विशेष कार्यक्रम आयोजित करून इतिहासाची आठवण जपली असती तर अधिक आनंददायी अनुभव मिळाला असता, असे मिनी ट्रेन प्रवासी आचल पोद्दार यांनी सांगितले. तर काहींनी सोशल मीडियावर याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. या महत्त्वाच्या दिनी कोणताही औपचारिक कार्यक्रम न घेतल्याने रेल्वे प्रशासनाची उदासीनता दिसून येते.

मध्य रेल्वेने या ऐतिहासिक वर्षासाठी मुंबई ठिकाणी नवनवीन बदल करत नवीन वातानुकुलित गाड्या सुरू केल्या आहेत, ही आनंदाची बाब असताना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा विसर पडणे हे शोभनीय नसल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. नेरळ-माथेरानची टॉय ट्रेनही केवळ पर्यटनाचा भाग नाही, तर भारताच्या अभियांत्रिकी इतिहासाचा सन्मान आहे. सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून, त्याची जागतिक पातळीवर ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन, पर्यटन खाते आणि इतिहासप्रेमींनी एकत्र येऊन या ठिकाणी दरवर्षी १६ एप्रिलला ‘टॉय ट्रेन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे.

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू होऊन आज ११८ वर्षे पूर्ण झाली. नेरळ, माथेरान या रेल्वे स्थानकावर त्यानिमित्ताने मिनी ट्रेनचा ११८वा वाढदिवस साजरा करणे गरजेचे होते. मात्र तसे नेरळ आणि माथेरान या दोन्ही स्थानकावर झाले नाही, हे दुर्दैव आहे.

- जनार्दन पार्ट, सामाजिक कार्यकर्ते

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री