ठाणे

थर्टी फर्स्ट साजरा करण्याची तयारी, ठाण्यातील 'या' ठिकाणांवर पर्यटकांची तुफान गर्दी

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. मुरबाडमधील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टाॅरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजून गेली आहेत.

Swapnil S

मुरबाड : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. मुरबाडमधील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टाॅरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजून गेली आहेत. नववर्षाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. मुरबाड, बदलापूर, माळशेज घाट, नाणेघाट, बारवी डॅम, म्हसा रोड, सिद्धगड माळ, दाऱ्याघाट, मोरोशी, धसई पळू, सोनावळे, सिंगापूर, मढ यासह मुरबाड तालुक्यामधील छोटे-मोठे फार्महाऊस, रिसॉर्ट, बंगलो, एमटीडीसी पर्यटन स्थळांची आतापासूनच हाऊसफुल्ल बुकिंग झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

येत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सरत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मुरबाडमध्ये दाखल झाल्याने मुरबाडमधील स्थानिकांना आर्थिक आधारा मिळणार आहे. माळशेज घाटातील परिसराला अधिक पसंती मिळत आहे. निसर्गरम्य वातावरणात अनेकांनी अनधिकृतरीत्या खासगी फार्महाऊस, रिसॉर्ट, बंगलो यांचे बांधकाम केले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अवैध धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा फार्महाऊसधारक, बंगलो, रिसॉर्टधारकावर कारवाई करण्यास संबंधित विभाग टाळाटाळ करत आहेत. दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून कोट्यवधींची उलाढाली होत असते. २५ डिसेंबरपासून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, शासकीय कार्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेकांनी आपल्या फॅमिलीसह पर्यटन स्थळे गाठली आहेत. मुरबाड माळशेज घाटात एकमेव परवानाधारक शासकीय एमटीडीसी पर्यटन हॉटेल आहे. परंतु तालुक्यामध्ये शासनाची परवानाधारक एकही रिसॉर्ट नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. थर्टी फर्स्टमध्ये दारूड्यांचा त्रास होऊ नये यासाठी मुरबाड पोलीस सज्ज झाले आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश