Kalyan : शक्तीधाम रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप 
ठाणे

Kalyan : शक्तीधाम रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत बाळाच्या आईने डॉक्टरांच्या आपल्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत बाळाच्या आईने डॉक्टरांच्या आपल्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी शक्तीधाम रुग्णालयात धाव घेत संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. आवश्यक वैद्यकीय उपचार आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप मृत बाळाच्या आईने केला आहे. प्रसूतीदरम्यान यावेळी गायकवाड यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी प्रामुख्याने गरीब आणि गरजू नागरिक येत असतात. मात्र, अनेक ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता तसेच काही ठिकाणी रुग्णांशी अयोग्य वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. येत असल्याचे सांगितले.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि डॉक्टर अथवा संबंधित कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.

गणरायाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! ऑगस्ट महिन्यात साडेतीन हजारांहून अधिक तक्रारी; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मंडळांची चिंता वाढली

सुटे तेलविक्री बंदीविरोधात व्यापारी आक्रमक; सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

डिजिटल अरेस्ट : मुंबईत ED कडून दोघांना अटक