ठाणे

पालघर जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर

जव्हार मधून ०५ मोखाडा- ०२ आणि विक्रमगड- ०३ अशा या तीन तालुक्यातून दोन जागांसाठी तब्बल १० उमेदवार रिंगणात उतरले होते

संदीप साळवे

ठाणे - पालघर जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या सर्वसाधारण मतदार संघातून मोखाड्याचे हेमंत लहामगे आणि विक्रमगडचे प्रशांत नडगे यांनी विरोधकांना चार खानी चीत करीत बाजी मारली. निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच शिक्षक संघटना आणि गटांनी आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी राजकीय डावपेच आखून ही पंचवार्षिक निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.


सर्वसाधारण मतदार संघातून जव्हार मधून ०५ मोखाडा- ०२ आणि विक्रमगड- ०३ अशा या तीन तालुक्यातून दोन जागांसाठी तब्बल १० उमेदवार रिंगणात उतरले होते. एकूण ११७७ मतदारांपैकी जवळपास ९७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान केले होते.त्यापैकी हेमंत लहामगे यांना सर्वाधिक ५१७ मते मिळून निवडून आले तर दुसऱ्या क्रमांकाची प्रशांत नडगे यांना ३९२ मते मिळवून ते विजयी झाले.

रोज मूठभर भोपळ्याच्या बिया खा; हृदयापासून पचनापर्यंत होतील महत्त्वाचे फायदे

Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी

रुपाली भोसलेचा मराठमोळा अंदाज; 'साज शृंगार' म्हणत शेअर केले खास फोटो

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल